मोडी लिपी लिखाण

देवनागिरी लिपीची जलद लिपी म्हणून मोडी लिपी ओळखली जाते. देवनागरी व बाळबोध सुधारित करून मोडी विकसित झाली आहे. मोडी लिपिला पिशाच्यलिपी म्हणून ओळखली जाते.

मोडी लिखाण

देवनागिरी लिपीची जलद लिपी म्हणून मोडी लिपी ओळखली जाते. लेखणी कमीत कमी वेळा उचलून भरभर लिहिता यावे म्हणून या लिपीची निर्मिती झाली. मोडी लिपिला पिशाच्यलिपी म्हणून ओळखली जाते. जवळ जवळ 700 वर्षपुर्वी देवनागरी लिपी प्रचलित होती. देवनागरीत काना, मात्रा, इकार, उकार देताना प्रत्येक वेळी हात उचलावा लागे तो वेळ वाचावा व अतिजलद लिहिता यावे म्हणून मोडी लिपीचा वापर सुरू झाला. मोडी लिपीत लिहिताना प्रथम डावीकडून उजवीकडे पूर्ण शिरोरेघ आखून अक्षरे न मोडता कमीतकमी हात उचलून लिहण्यास सुरुवात करतात. मोडी अक्षर सरळ नसून वळणदार आहे. आकार व काना शक्यतो खालून वर लिहून दुसऱ्या अक्षराला जोडतात. मोडी लिपीत शब्ध व वाक्य कुठे तोडावे याला बंधन नाही. मोडी लिपीत सर्व इकार दीर्घ असतात व सर्व उकार ऱ्हस्व असतात. मोडी लिपीत एकेरी उकार व इकार असल्यामुळे व्याकरणात कमी चुका होतात. मोडी लिपीत व्यंजनाचे तीन विशिष्ट प्रकार आहे. १. जे स्वराबरोबर जोडल्यास आपले अस्तित्व टिकवून ठेवतात व बाळबोध प्रकाराप्रमाणे असतात. २. जे आपले अस्तिव काही ठराविक व्यजनासोबतच बदलतात. ३. जे स्वर व व्यंजनातून जोडाक्षरे बनतात व त्या स्वरावरून आपले अस्तित्व टिकवतात.

प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोडी लिहिणाऱ्यापेक्षा मोडी वाचणारा अधिक प्रज्ञावान असावा असे म्हणतात. जलद लिखाण व लपेटीउक्त लेखनपद्धती, विविध कालगणना, रेघी मांडणी, मायने, शब्धसंशेप्त, शिक्के किंवा मुद्रा, सांकेतिक नावे, अपभ्रष्ट नावे, स्थलनामे, व्यक्तिनामे, शब्दाथ, गुढअर्थ, पदव्या, 'किताब, विशिष्ट खुणा किंवा निशाण्या हे विषय परस्परांशी संबधित व अवलंबित आहेत.

इ. स. १८९४ मध्ये नगर येथून गाव गन्ना सर्क्युलर हे वर्तमान पत्र निघत होते.

  • Image
  • इ.स. १९०५ मध्ये बेळगांव येथुन मोडिलिपीत खबरदार वर्तमान पत्र निघत होते.

अक्षरांची कलाकुसर