मोडीलिपीचा इतिहास

मोडीलिपी केव्हा पासून सुरू झाली याबाबत इतिहास तज्ञांत एकमत नाही. काही संशोधकाच्या मते मोडी लिपीचा उगम सुमारे २ हजार वर्ष इतका असावा.

मोडीलिपीचा इतिहास

भारतात मगध सामराज्यात मोरयावशाचे महपराक्रमी राजेचंद्रगुप्त सम्राठ अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानले सातशे वर्षापूर्वी दक्षिण हिंदुस्थानात यादवांचे सामर्जा होते महादेवराव यादवांचे कारकिर्दीत हेमाडपंत नामक प्रख्यात महामंत्री होऊन गेला ई १२६० श १९८२ त्यानी यादव राजाशीघन यांच्या वेळेपासून दरबारचे काम संस्कृत भाषेत चालत असे परंतु हेमाद्रिने राजकीय कागदपतर ,सनदा, दानपत्रे ,फर्माने, हुकुंनामे, नीवाडपत्रे, इनामपत्रे वैगरे मराठीत लिहीण्याचा नवीन उपक्रम सुरू केला

काळानुसार मोडीलिपीचे यादवकालीन, शिवकालीन, पेशेवेकालिन आणि आग्लकलिन असे ढोबळ विभाग पाडता येतील.

यादवकालीन इतिहास

यादवकाळ : (श.१३०० ते श.१६३०)याकाळात लेखनासाठी सामान्यतः बोरूचा वापर करीत. बोरू म्हणजे ७ ते ८ इंच लांब बाजूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची लेखणी तयारकरीत. त्यामुळे हस्ताक्षर जाडे आकाराने मोठे स्ष्पट आणि त्याचे वाचन सुलभ असे. बोरुने लेखन करताना एक अक्षर काढताना तो वारवार शाईच्या दौतित बुडवावा लागत असे. महादेवराव यादावाचे काळात मराठी भाषेला आणि मोडीलिपीला राज्यकारभारात स्थान मिळाल्याने जनमानसात इतकी रुजली की पुढे अहमदनगर, विजापुर गोवळ्कोंडे येथील मुसलमान राज्यकर्ते आपलीफर्माने, हुकुमनामे, निवाड्पत्रे, दानपत्रे, इनामपत्रे लिहिताना मोडीचा अवलंब करीत

शिवकालीन इतिहास

शिवकाळ (श.१६३० ते शके १७१४) :यावेळी लेखनातून बोरूचा वापर कमी होऊन त्याजागी झाले. टाकाने लिहीणे सुरू झाले. टाकाने लिहिलेला मजकूर लपेतीडार आकाराने लहान गुंतागूतीचा असे .त्यात अनेक शब्द सांशेप वापरले जाउ लागले बर्याच सुधारणा करून लेखनाचा वेग वाढविला मात्र त्यात अरबी,फारशी भाषेतील शब्ध येऊ लागले. शिवकालीन १७व्या शतकात चिटणीशी पद्धत विकसित झाली. बाळाजी आवजी हा राजे शिवाजी भोसलेच्या काळात सचिव होता त्याने मोडी लिपी तयार केली अस काही लोक म्हणतात.

पेशेवेकालिन इतिहास

१८व्या शतकात पेशवे काळात चिटणीसी, बिल्वकारी, महादेवपंती व रानडी पद्धत असे प्रकार होते.

आग्लकलिन इतिहास

ब्रिटिशकालीन मोडी ब्रिटिश काळा हा मोडीचा शेवटचा काळ होता. इंग्रज राजवट सुरु झाल्यावर छापखाने सुरु झाले. मोडी लिपी छापखान्याच्या दृष्टीने अत्यंत ग्यारसोयीची होती. जुलै १९१७ रोजी मुंबई प्रात अधिकारी यांनी मोडी लिपी बंद करण्याचा निर्णय घेतला, तरीही शाळा व इतर व्यापरी ठिकाणी मोडी लिपी प्रचलित होती . इ. स. १९५२ पर्यन्त हि अस्तित्वात होती.

सर्वात जुना उपलब्ध कागद ई.१३८९ श.१३११ मधील असून तो भारत इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रलयात उपलब्ध आहे.

इतिहास हा कल्पनेवरुन लिहिता येत नाही, त्यामध्ये ललितासारख्या रंजक किवा तर्कावर आधारीत गोष्टी लिहून चालत नाही, कल्पनेवर वा तर्कावर लिहिलेल्या इतिहासाचे संशोधकीय दृष्ट्या काहीच मूल्य नाही. खरा इतिहास लिहिण्यासाठी अस्सल साधनांचा संदर्भ महत्वाचा असतो, अशी प्रमुख अस्सल कागदपत्रे बहुतांशी मोडी लिपीत आज उपलब्ध आहेत, गरज आहे ती फक्त शोधण्याची अन्‍ अभ्यास करण्याची, खरा इतिहास समजण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा मोडी लिपी कागदपत्रांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दफ्तरखन्यांत दडलेला आहे. त्याला बाहेर काढून त्याचे वाचन होणे गरजेचे आहे.