मोडी लिपी लिप्यांतर

मोडी वर्णाक्षर, बाराखड्या कितीही गिरवल्या तरी प्रत्यक्ष कागदपत्र वाचताना त्याचा फारसा उपभोग होत नाही असा अनुभव येतो. कारण लेखकाने ती अक्षरे खास स्वतःच्या शैलीत काढून मन मानेल तशा काना, मात्रा, वेंलाट्या काढलेल्या असतात.

मोडी लिप्यांतर

कागदाचा शोध चिनी लोकांनी लावला, तेव्हापासून कागदाचा वापर लिहिण्यासाठी केला जात आहे. त्यापूर्वी लेखनासाठी शिळा, भूर्जपत्रे, कापड, बांबू पट्ट्या इ. साधनांचा वापर केला जात असे. कागदांचा शोध लागल्यापासून कागदावर लेखन करण्याची पद्धत रुढ झाली, कागदावर लिहिण्याचे फायदे आहेत. जतन करण्यास सोपे वगैरे कारणांमुळे कागदाला महत्व प्राप्त झाले. कागद जतन करुन ठेवण्याच्या संचयालाच दफ्तरे असे म्हणतात.

लेखन कला अवगत झाल्यानंतर चिन्ह, चित्रकला, चित्र, कोरीव शिल्पे, लाकडांवर, दगडांवर, गुहेतील शिलालेखांवर, पशुपक्षांच्या कातड्यावर लेखन केले जाऊ लागले. लेखन साहित्यामध्ये सुधारणा होत गेल्यानंतर पिढ्यांना लेखन कायमस्वरुपी उपलब्ध व्हावे. या उद्देशाने कागदांचा संचय करुन जतन करण्याच्या संकल्पनेमधून दफ्तरखाने उदयास आले. भारतात शासकीय दफ्तरांची सुरुवात इंग्रजांनी केली, असली तरी त्या अगोदर कितीतरी शतके भारतात साहित्य जतन केले जात होते.

सरकारी यंत्रणा, खाजगी संस्था व अभ्यासक या सर्व कागदांचे जतन करत यथाशक्ती वाचन करतात. मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. सदरच्या कार्याला इतिहासप्रेमी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, पण या सगळ्या कार्यातूनही अजून लाखो कागदपत्रांचे वाचन बाकी आहे. पुराभिलेखागार संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये मोडी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. खाजगी संस्था व अभ्यासक मोडी प्रशिक्षण वर्ग घेण्याचे उपक्रम करतात. विद्यार्थी, इतिहासप्रेमी लोक यात सहभागी होतात, पण हे प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. मुख्यत: शासकीय पातळीवर काही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.

इतिहासकार राजवाडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचे महत्व सांगताना म्हटले आहे की, ‘‘एक अस्सल ऐतिहासिक कागदाचा चिटोरा दहा बखरीपेक्षा लाख मोलाचा असतो. अस्सल ऐतिहासिक माहिती अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकू शकते, त्यामुळे अशा सर्व ऐतिहासिक कागदांना अतिशय महत्व आहे.’’ इतिहासातील एखाद्या प्रसंगावरील आधारीत असलेल्या चुकीच्या कल्पनांना अस्सल कागदातील माहितीच्या आधारे स्पष्ट केले जाऊ शकते. आपल्या इतिहासामधील आपल्याला माहिती असलेले कितीतरी प्रसंग आज आपणाला खरे वाटतात, पण ह्याच प्रसंगाचा अस्सल कागदपत्रांच्या आधारे अभ्यास केल्यास फरक दिसतो. अजून कोट्यवधी मोडी कागदपत्रांचे वाचन होणे बाकी आहे. सदरचे वाचन पूर्ण होईपर्यंत हे मोडी दस्तऐवज टिकावेत एवढी अपेक्षा आहे.

प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोडी लिहिणाऱ्यापेक्षा मोडी वाचणारा अधिक प्रज्ञावान असावा असे म्हणतात. जलद लिखाण व लपेटीउक्त लेखनपद्धती, विविध कालगणना, रेघी मांडणी, मायने, शब्धसंशेप्त, शिक्के किंवा मुद्रा, सांकेतिक नावे, अपभ्रष्ट नावे, स्थलनामे, व्यक्तिनामे, शब्दाथ, गुढअर्थ, पदव्या, 'किताब, विशिष्ट खुणा किंवा निशाण्या हे विषय परस्परांशी संबधित व अवलंबित आहेत.

लिप्यांतरसाठी संपर्क

विवेक सदानंद चव्हाण,
१४०/बी, पोलीस चोकीसमोर,
वरळी कोळीवाडा, मुबंई ४०० ०३०
मोबाइल नंबर: 9820153286
ई-मेल: vivek42you@gmail.com
गजानन विश्वनाथ साळगावकर,
१६६/ ५२९९,हरयाली जीवन, कन्नमवार नगर नंबर -१,
विक्रोळी- (पूर्व), मुबंई ४०० ०८३
मोबाइल नंबर: ९८३३१०१९६६
ई-मेल: vivek42you@gmail.com