प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोडी लिहिणाऱ्यापेक्षा मोडी वाचणारा अधिक प्रज्ञावान असावा असे म्हणतात. देवनागिरी लिपीची जलद लिपी म्हणून मोडी लिपी ओळखली जाते. देवनागरी व बाळबोध सुधारित करून मोडी विकसित झाली आहे. मोडी लिपिला पिशाच्यलिपी म्हणून ओळखली जाते.
मोडी लिपी शिकण्याचा खरा आनंद मराठी जाणणाराच चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो मोडी मजकुरातील शब्द योग्य ठिकाणी तोडून अर्थपूर्ण वाचन करणे ही एक कष्टसाध्य कलाच आहे कारण लिखाणामागील संदर्भ ध्यानी ठेवावा लागतो. मोडी शिकणाऱ्याने वर्णाक्षर, बाराखड्या कितीही गिरवल्या तरी प्रत्यक्ष कागदपत्र वाचताना त्याचा फारसा उपभोग होत नाही असा अनुभव येतो. कारण लेखकाने ती अक्षरे खास स्वतःच्या शैलीत काढून मन मानेल तशा काना, मात्रा, वेंलाट्या काढलेल्या असतात. मोडी लिपी ही देवनागरीची जलद लिपी आहे. अगदी स्वातंत्र्य काळा पर्यंतचा सर्व व्यवहार व कागदपत्रे मोडीतून असल्यामुळे मोडीत बराच इतिहास दडलेला आहे. आज भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, तामिळनाडू तसेच केरळ आदी मराठयांचे राज्य असलेल्या ठिकाणी मोडी लिपीतील कोट्यवधी कागदपत्रे वेगवेगळ्या सरकारी, खाजगी तसेच संस्थाच्या दफ्तरात धूळ खात पडून आहेत. अनेक घराण्यात वंशपरंपरागत ताम्रपट, कागदपत्रे वाचकांची वाट पाहत पडून आहेत हे साहित्या लिहु व वाचू शिकणार्या सामान्य जनांना उपलब्ध करण्याच्य दृष्टीने प्रयत्नय करणे व मोडीलिपीचा प्रसार करणे हेच आमचे उद्दिष्ट
प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोडी लिहिणाऱ्यापेक्षा मोडी वाचणारा अधिक प्रज्ञावान असावा असे म्हणतात. जलद लिखाण व लपेटीउक्त लेखनपद्धती, विविध कालगणना, रेघी मांडणी, मायने, शब्धसंशेप्त, शिक्के किंवा मुद्रा, सांकेतिक नावे, अपभ्रष्ट नावे, स्थलनामे, व्यक्तिनामे, शब्दाथ, गुढअर्थ, पदव्या, 'किताब, विशिष्ट खुणा किंवा निशाण्या हे विषय परस्परांशी संबधित व अवलंबित आहेत. इतिहास हा कल्पनेवरुन लिहिता येत नाही, त्यामध्ये ललितासारख्या रंजक किवा तर्कावर आधारीत गोष्टी लिहून चालत नाही, कल्पनेवर वा तर्कावर लिहिलेल्या इतिहासाचे संशोधकीय दृष्ट्या काहीच मूल्य नाही. खरा इतिहास लिहिण्यासाठी अस्सल साधनांचा संदर्भ महत्वाचा असतो, अशी प्रमुख अस्सल कागदपत्रे बहुतांशी मोडी लिपीत आज उपलब्ध आहेत, गरज आहे ती फक्त शोधण्याची अन् अभ्यास करण्याची, खरा इतिहास समजण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा मोडी लिपी कागदपत्रांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दफ्तरखन्यांत दडलेला आहे. त्याला बाहेर काढून त्याचे वाचन होणे गरजेचे आहे. जेष्ठ इतिहास संशोधकांना मोडी लिपी लिहिता वाचता येते, पण काही नवोदित इतिहास संशोधकांना मोडीचा गंधही नाही, याचे मूळ कारण असे की इतिहासाच्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमात मोडीला कुठेही स्थान नाही. इतिहासावर संशोधन करुन आपला PhD चा प्रबंध सादर करणारा अभ्यासक मोडी लिपी जाणणारा असेलच असं नाही. आम्ही लवकरच ऑन लाईन कोर्स चालू करत आहोत.